एकादशी खुलासा
पुत्रदा एकादशी खुलासा
रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी एकादशी समाप्ती उ. रात्री ४ वा. १८ मि. असून दुसरे दिवशी द्वादशी समाप्ती उ. रात्री ६.२० वाजता आहे. दि. २५ ऑगस्ट रोजी ज्या गावी सूर्योदय स. ६.२० पूर्वी होत आहे अशा सर्व प्रदेशात द्वादशी तिथीची वृद्धी होत असल्याने एकादशीचे दिवशी म्हणजे दि. २३ ऑगस्ट रोजी पुत्रदा स्मार्त एकादशी असून दि. २४ ऑगस्ट रोजी पुत्रदा भागवत एकादशी असेल. तर दि. २५ रोजी सकाळी ६.२० नंतर सूर्योदय होत असलेल्या गावी त्रयोदशी तिथीची वृद्धी होत असल्याने एकादशीचे दिवशी म्हणजे दि. २३ ऑगस्ट रोजी एकच एकादशी असेल.
दि. २३ रोजी एकच एकादशी असलेली गावे
महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, चिपळूण, दापोलीसह संपूर्ण कोंकण, संपूर्ण गोवा, गुजरातमधील सूरत, राजकोट, जुनागढ इत्यादी.
दि. २३ रोजी स्मार्त व दि. २४ रोजी भागवत एकादशी असलेली गावे
मुंबई व कोंकण किनारपट्टी सोडून इतर संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण कर्नाटक, गुजरात मधील अहमदाबाद, वडोदरा व त्याच्या पूर्वेकडील सर्व प्रदेश इत्यादी.