हरितालिका तृतीया व श्री गणेश चतुर्थी खुलासा
सोमवार दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी
पंचांगामध्ये हरितालिका तृतीया व श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी दिलेली आहे. या दिवशी तृतीया समाप्ती सकाळी ७ वाजून ०६ मिनिटांनी आहे.
अधिक माहिती
हरितालिका तृतीयेसाठी सूर्योदयव्यापिनी तृतीया आवश्यक असते, तर श्री गणेश चतुर्थी करिता चतुर्थी तिथी मध्यान्हकाळ व्यापिनी असावी लागते. सोमवार दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी सूर्योदयकाली तृतीया व मध्यान्ही चतुर्थी असल्याने हि दोन्हीही व्रते एकाच दिवशी आलेली आहे.
पूजेचा क्रम
उषःकालापासून मध्यान्ह समाप्तीपर्यंत पूजनाचा मुख्य काल असल्याने व दोन्हीही व्रतांचे कर्ते भिन्न असल्याने कोणतीही पूजा आधी अथवा नंतर करता येईल.